gmch aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

घाटी रुग्णालयात मिळणार माणुसकीचा हात 

योगेश पायघन

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांतील गरजूंना आवश्‍यक मदत आणि घाटीला दान करू इच्छिणाऱ्या दात्यांत समन्वयासाठी स्वतंत्र व्हॉट्‌सऍप ग्रुप कार्यान्वित करणार आहोत. याशिवाय अपघात विभागाजवळ "माणुसकीचा हात' असा स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची संकल्पना असल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.

गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता अधिष्ठातांच्या दालनात शहरातील काही अशासकीय संस्था, सेवाभावी संस्था, डोनर्सचे प्रतिनिधी व व्यक्ती यांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. हरबडे यांच्या वैद्यकीय अधीक्षकपदाच्या नियुक्तीबद्दल त्यांचा सत्कार केला. होली हेल्पिंग हॅन्डचे अकबर भाई यांनी एनजीओ आणि डोनरला सोबत घेऊन अधिष्ठाता यांची भेट घेतली.

यावेळी घाटीतील समाजसेवा, रक्तदान याबाबत चर्चा केली. यावेळी रुग्णालयात माणुसकीचा हात असा स्वतंत्र कक्ष उभारण्याची मनोदय व्यक्त केला. यात रुग्णांसंबंधी गरज असलेले साहित्य, मेडिसीन व इतर वस्तू रुग्णांना मदत होणाऱ्या गोष्टी दात्यांकडून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी गरीब रुग्णांना, निराधार रुग्णांना इमर्जन्सीच्या वेळेस वेळेवर इंजेक्‍शन, औषधे मिळून देण्यासाठी मदतीचे आवाहन केले. बैठकीला डॉ. अनिल जोशी डॉ. संजय गवई, उपअधीक्षक डॉ. विकास राठोड, डॉ. संजय वाकुडकर, श्‍याम वाकळे, संदीप भडांगे, नरेंद्र भालेराव, शलाका व्यवहारे, अनुसया घोगरे, संतोष पवार, लक्ष्मीकांत शिंगोटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT